हवामान अंदाज महाराष्ट्र 2021: पुढील 3 दिवस “या जिल्ह्यात” विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना व गारपीटसह अवकाळी पाऊस | Havaman Andaj

हवामान अंदाज महाराष्ट्र 2021 : आजचा पावसाचा अंदाज व गारपीट, वादळी वारे आणि अवकाळी पाऊस माहिती. Havaman Andaj Vidarbha, Kokan, Marathwada

शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसापासून राज्यांमध्ये आपल्याला वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झालेला बघायला मिळत आहे आणि गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अवकाळी पावसाने सुद्धा आपला जोर वाढलेला आहे तर काही ठिकाणी गारपीट सुद्धा झालेले आहे आणि ह्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेलं दिसून येत आहे.

याच पार्श्वभूमीवर दिनांक 20 मार्च 2021 ते दिनांक 22 मार्च 2021 पर्यंत राज्यात कोणकोणत्या भागांमध्ये आपल्याला गारपिटीचा आणि जोरदार पावसाचा अंदाज निर्माण होत आहे हेच आपण आजच्या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.  सोबतच महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागांचा दररोजचा हवामान अंदाज सुद्धा यामध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत.

20 मार्च 2021 चा हवामानाचा अंदाज

20 तारखेला कोकणामध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. तर मध्य महाराष्ट्र मध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा विभागातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह गारा पडण्याची शक्यता राहील तर विदर्भातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारा होण्याची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.

21 मार्च 2021 चा हवामानाचा अंदाज

21 तारखेला कोकणामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहील. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात येत आहे. मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता राहील तर विदर्भातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहील.

22 मार्च 2021 चा हवामान अंदाज

22 मार्चला कोकणामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहील तर मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता व काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची सुद्धा शक्यता आहे. विदर्भामध्ये मात्र पावसाचा जोर कमी राहील आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे.

हे पण वाचा : ऑरेंज अलर्टवर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड; 20 मार्चपर्यंत पाऊस, वादळी वारे आणि गारपिट होण्याची शक्यता – Havaman Andaj Maharashtra

विदर्भातील जिल्ह्यांचा हवामानाचा अंदाज आणि इशारा

20 मार्च आणि 21 मार्चला नागपूर मध्ये एक ते दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. सोबतच वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा एक ते दोन ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे अमरावती, बुलढाणा आणि वाशीम या जिल्ह्यांमध्ये हलक्‍या मध्यम पावसाचा अंदाज असून यवतमाळ मध्ये एक ते दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार जाण्याची शक्यता आहे हवामान विभागातर्फे वर्तवण्यात येत आहे.

 अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपल्या वेबसाईटवरील माहिती आवडत असेल तर ही माहिती खालील व्हाट्सअप आणि फेसबुक चे बटन वापरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांसोबत शेअर नक्की करा आणि आपण दिलेला व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका सोबतच आपल्या आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आवश्य प्रेस करा आणि तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील किंवा तुम्हाला कोण तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज हवा असेल तर याबद्दल आम्हाला कमेंट तुम्ही करू शकता धन्यवाद.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *